
आता रोहा स्थानकावर लांबपल्ल्याच्या १० अतिजलद गाड्या (एक्स्प्रेस ट्रेन) थांबणार.
कोकणातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. आता रोहा स्थानकावर लांबपल्ल्याच्या १० अतिजलद गाड्या (एक्स्प्रेस ट्रेन) थांबणार आहेत. रत्नागिरी ते पनवेल यामध्ये थांबा असावा अशी कोकणातील प्रवाशांची मागणी होती.खासदार सुनील तटकरे यांच्या पाठपुराव्यामुळे कोकणातील प्रवाशांची ही मागणी पूर्ण झाली आहे. आता अलिबागपासून खेडपर्यंच्या प्रवाशांना याचा लाभ होणार असल्याचे तटकरे यांनी म्हटले आहे.
रोहा स्थानकावर प्रायोगिक तत्वावर थांबणाऱ्या १० अतिजलद गाड्या :
1. 11099 लोकमान्य टिळक टर्मिनस मडगाव एक्सप्रेस
2. 11100 मडगाव – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
3. 22629 दादर- तिरुनेलवेली एक्सप्रेस
4. 22630 तिरुनेलवेली – दादर एक्सप्रेस
5. 12217 कोचुवेली- चंदीगढ़ एक्सप्रेस
6. 12218 चंदीगढ़ – कोचवेली एक्सप्रेस
7. 20931 कोचुवेली – इंदूर एक्सप्रेस
8. 20932 हिसार-कोइंबतूर एक्सप्रेस
9. 22475 कोइंबत्तूर – हिसार एक्सप्रेस
10. 22476 कोइंबतूर-हिसार एक्सप्रेस
रोहा स्थानकावर थांबणाऱ्या १० अतिजलद गाड्यांपैकी एक असलेल्या कोचुवेली इंदोर एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवत खासदार सुनील तटकरे यांनी रेल्वेच्या निर्णयाचे स्वागत केले. या प्रसंगी त्यांनी एक्स्प्रेसचे पहिले तिकीट एका प्रवाशाला दिले. गाडीच्या स्वागतासाठी रोहेकरांनी मोठी गर्दी केली होती. मंत्री आदिती तटकरेदेखील तेथे उपस्थित होत्या.