मतदानाच्या दिवशी नौका मासेमारीसाठी समुद्रात जाणार नाहीत
७ मे रोजी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील निवडणुकीचे मतदान होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार या मतदानाच्या दिवशी नौका मासेमारीसाठी समुद्रात जाणार नाहीत.रत्नागिरी जिल्ह्यात २ हजार ५२० सागरी मासेमारी नौका आहेत. जिल्ह्यात ८५ मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था आहेत. या संस्थांना जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देऊन मतदानाच्या दिवशी मासेमारी नौका समुद्रात पाठवू नयेत, असे कळवले आहे. त्यामुळे ६ मे रोजी मासेमारी करून नौका पुन्हा बंदरात येतील त्या ७ मे रोजी मासेमारीसाठी जाणार नसल्याचे मच्छीमार नेते जावेद होडेकर यांनी सांगितले. www.konkantoday.com