आयपीएल 2024 मधील मुंबई इंडियन्सचं आव्हान संपुष्टात

आयपीएल 2024 मधील मुंबई इंडियन्सचं आव्हान संपुष्टात आलं आहे. कोलकाता विरुद्धच्या सामन्यात मुंबईचा पराभव झाल्याने प्लेऑफमध्ये पोहोचण्याआधीच मुंबई इंडियन्स संघाचं आव्हान संपलं आहे.वानखेडे स्टेडिअमवर शनिवारी पार पडलेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने मुंबई इंडियन्स संघाचा दारुण पराभव केला. कोलकाताने मुंबई संघाला 24 धावांच्या मोठ्या फरकानं हरवलं. मुंबईच्या घरच्या मैदानावर मुंबईचं प्लेऑफमध्ये पोहोचण्याचं आव्हान धुळीला मिळालं आहे. मुंबईच्या घरच्या मैदानावर कोलकाता संघाने विक्रम केला आहे.हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वात मुंबई इंडियन्स संघाचं यंदाच्या हंगामातील आव्हान संपलं आहे. प्लेऑफमध्ये पोहोचण्याआधी मुंबई इंडियन्स संघ बाहेर गेला आहे. यानंतर आता नेटकऱ्यांनी हार्दिक पांड्यावर टीकेची झोट उठवली आहे. नेटकऱ्यांनी हार्दिक पांड्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली असून सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल करण्यास सुरुवात केली आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button