कॉंग्रेसने ८० वेळा राज्यघटना बदलली, त्याचे काय? केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा सवाल
कोणत्याही रागाने, द्वेषाने भाजप सरकार बाबासाहेबांची घटना बदलणार नाही. मात्र ६५ वर्षे सत्ता भोगलेल्या कॉंग्रेसने ८० वेळा देशाची राज्यघटना बदलली त्याच काय? असा परखड सवाल केंद्रीय मंत्री आणि महायुतीचे लोकसभेचे उमेदवार नारायण राणे यांनी लांजा येथील महायुतीच्या सभेत उपस्थित केला.केंद्रीय मंत्री आणि भाजपा शिवसेना (शिंदे), मनसे, आरपीआय महायुतीचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभा गुरूवारी लांजा शहरातील शहनाई हॉल येथे पार पडली. यावेळी राणे बोलत होते.www.konkantoday.com