
केळशीतील दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू
दापोली तालुक्यातील केळशी येथे झालेल्या दुचाकीच्या अपघघातात यश खोत या केळशी येथील १७ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री १.३० च्या सुमारास घडली. यात त्याच्या दुचाकीमागे बसलेला मित्र गंभीर जखमी झाला. या प्रकरणी मृत यशवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दापोली पोलिसांच्या माहितीनुसार यश श्रीनिवास खोत हा रात्री केळशी गावातून समुद्राकडे जाणार्या रस्ताने दुचाकी घेवून जात होता. त्याच्याबरोबर त्याचा मित्र कैलास भुवड हाही होता. रात्री १.३० च्या सुमारास यशचा गाडीवरील ताबा सुटल्याने दुचाकी अपघातग्रस्त झाली. यात यशच्या तोंड्याला गंभीर दुखापत झाली. त्याच्या मागे असणार्या कैलासच्या पायाला गंभीर दुखापत झाली. जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र यशचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी यशने हयगयीने दुचाकी चालवून स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी त्याच्यावर दापोली पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.www.konkantoday.com