मुंबईत लोकलमधून पडून 139 जणांचा बळी, धक्कादायक माहिती समोर
गेल्या तीन महिन्यांत लोकलमधून पडून 139 प्रवशांचा मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वी रिया राजगोर आणि अवधेश दुबे यांचा लोकलमधून पडून मृत्यू झाला होता.या पार्श्वभुमीवर ही आकडेवारी समोर आली आहे. मुंबईकडे जाणाऱ्या कमी लोकलफेऱ्या, एसी लोकलमुळे वाढणारी गर्दी, कोलमडलेले वेळापत्रक आणि उशीरा धावणाऱ्या लोकलमुळे गर्दी वाढत आहे. आणि वाढलेल्या गर्दीमुळे अपघात वाढत असल्याचे सांगितले जात होते. या अपघातात काही लोक गंभीर जखमी झाले असून काहींना कायमचे अपंगत्व सुद्धा आले आहे.www.konkantoday.com