मुंबई-गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील भोगाव गावानजीक खेडच्या दिशेने येणारी खासगी ट्रॅव्हलर बस खोलदरीत कोसळली, 22 जण जखमी


मुंबई गोवा महामार्गाच्या अर्धवट कामामुळे अपघातांची मालिका सुरूच आहे कोणतेही सूचनाफलक न लावल्याने अनेक वेळा अपघात घडत आहेत
मुंबई-गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील भोगाव गावानजीक सोमवारी (दि.२४) पहाटे पाचच्या सुमारास भीषण अपघात झाला. पुण्याहून खेडच्या दिशेने येणारी खासगी ट्रॅव्हलर बस महामार्गावरील पुलाच्या अलीकडे असलेल्या बॅरिकेटला धडक देत सुमारे 45 ते 50 फूट खोल दरीत कोसळली.अपघातात २२ प्रवाशी गंभीर जखमी झाले असून त्यातील १० प्रवाशांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कामामुळे एक लेन बंद ठेवण्यात आली होती. पहाटे धुके असल्याने चालकाच्या नजरेस बॅरिकेटस् न पडल्याने हा अपघात घडल़्याचे सांगण्यात येते. बसची धडक बसताच ती थेट दरीत कोसळली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ बचावकार्य सुरू करत जखमींना वर काढले. पोलिस व महामार्ग सुरक्षा पथकानेही घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले.खेड तालुक्यातील कळंबनी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या जखमींची नावे खालीलप्रमाणे

शामल विजय अंजर्लेकर (वय 40 रा. गिम्हवणे, दापोली), काजल मारुती शिगवण (23 रा. दमामे, दापोली), दिलीप शिवराम मोहिते (55 रा. तळसर, चिपळूण), अमरनाथ मिलिंद कांबळे (27 रा. लातूर), दिपाली दत्ताराम नाचरे (27 रा. भडवणे, दापोली), प्रतीक प्रकाश गुरव (22 रा. शिरवली, खेड), प्रिया प्रकाश गुरव (23 रा. शिरवली, खेड), आळंदी बालाजी नाचरे (74 रा. दमामे, दापोली), सर्वेश दीपक गुहागरकर (22 रा. आडे, दापोली), मयुरी मारुती शिगवण (45 रा. दमामे, दापोली) याशिवाय चालक, वाहक तसेच इतर दहा प्रवाशांना चिपळूण येथील खासगी रुग्णालयात तसेच डेरवण रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button