मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यातील एकेरी वाहतूक अखेर खुली
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यानजिक गर्डर बनविण्याच्या कामासाठी गुरूवारी दिवसभर अचानक खंंडीत करण्यात आलेली वाहतूक अखेर रात्रीच्या सुमारास पूर्ववत झाल्याने वाहनचालकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. १ मे पासुन कशेडी बोगद्यातून दुतर्फा वाहतूक सुरू करण्याच्या दृष्टीने बोगद्यातील अंतर्गत कामांनी वेग घेतला आाहे.कशेडी बोगद्यातून मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणार्या एकेरी वाहतुकीस मुभा देण्यात आली आहे. उन्हाळी सुट्टीच्या हंगामामुळे महामार्गावर वाहनाची वर्दळ कमालीची वाढली आहे. त्यामुळे कशेडी बोगद्यातून प्रवास सुसाट अन आरामदायी होत असल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मात्र कुठलीही पूर्वसूचना न देता कशेडी घाट कामासाठी अचानक बंद केला जात असल्याने वाहनचालकांची त्रेधातिरपीट उडत आहे. www.konkantoday.com