शांततापूर्ण आणि सुलभ मतदानासाठी सर्वांनी आवश्यक प्रयत्न करावेत- मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

रत्नागिरी, दि. २८- रत्नागिरी –सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात मतदानाचे प्रमाण वाढावे आणि मतदारांना शांततापूर्ण तसेच सुलभपणे मतदान करता यावे, त्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी आवश्यक ते प्रयत्न करावेत. त्या दृष्टीने मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा करुन त्याची माहिती मतदारांना द्यावी, असे निर्देश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम व यांनी आज दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात श्री. चोक्कलिंगम यांनी आज आढावा बैठक घेतली. बैठकीला निवडणूक निर्णय अधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी सर्वसाधारण निरीक्षक राहूल यादव, खर्च निरीक्षक अंकुर गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, परिविक्षाधीन आय ए एस डाॕ जस्मीन, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्राकांत सूर्यवंशी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहूल गायकवाड आदींसह नोडल अधिकारी उपस्थित होते. मुख्य निवडणूक अधिकारी श्री चोक्कलिंगम म्हणाले, लोकसभा निवडणूक मुक्त निर्भय व पारदर्शी वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे. तीव्र उन्हाची दक्षता घेवून मतदारांना रांगेमध्ये उभे राहू नये, यासाठी प्रतीक्षा कक्षाची सुविधा ठेवा. त्याच बरोबर पावसाचा अंदाज व मागील अनुभव घेवून त्याबाबतही दक्षता घ्यावी. निवडणुकीत मद्य, पैसा याचा वापर टाळण्यासाठी भरारी पथके, स्थीर निगराणी पथकांना अधिक सक्रीय करा. वन खात्याचे तपासणी नाके सुरु करावेत, असे सांगून ते म्हणाले, कायमस्वरुपी स्ट्रॉंग रुम, मतमोजणी केंद्र निर्मितीसाठी विशेष प्रयत्न करावेत. भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे सर्वांनी पालन करावे. वेबकास्ट्रींगद्वारे नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवा. निवडणूक प्रक्रिया सुरु असताना कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, यावर विशेष लक्ष ठेवावे. कोठेही अशी घटना लक्षात आल्यास वेळीच उपाय योजना कराव्यात. मतदार माहिती चिठ्ठीचे वाटप वेळेत करा. मतदानाची टक्केवारी वाढविण्यावरही विशेष भर द्यावा. शॕडो एरियामध्ये सॕटेलाईट फोनचा वापर करा. सुक्ष्म निरीक्षक हे सर्वसाधारण निरीक्षकांचे, तर सर्वसाधारण निरीक्षक हे भारत निवडणूक आयोगाचे कान आणि डोळे आसतात. त्यादृष्टीने नोंदी ठेवून अहवाल सादर करावा. तुम्ही सर्वांनी चांगली तयारी केल्याचे सांगून, त्यांनी सर्वांना शुभेच्छाही दिल्या. निवडणूक निर्णय अधिकारी श्री.सिंह यांनी संगणकीय सादरीकरण करुन सविस्तर माहिती दिली. मतदार संख्या, मतदान केंद्रांवरील सुविधा, बेल लिपीतील मतदार चिठ्ठीचे वाटप, आदर्श आचारसंहिता कक्षाची कार्यवाही, खर्च विषयक तक्रारींचे निरसन, स्वीप आदींचा यात समावेश होता.पोलीस अधीक्षक श्री.कुलकर्णी यांनीही संगणकीय सादरीकरण करुन, कारवाई, प्रतिबंधात्मक कारवाई पोलीस बंदोबस्त, सुरक्षा आदींची सविस्तर माहिती दिली.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button