कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध होवूनही अर्जुना कालव्याच्या अपूर्ण कामामुळे शेतकर्यांचे नुकसान
पंतप्रधान सिंचन योजनेंतर्गत कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध होवूनदेखील पाटबंधारे बंधकाम विभागाच्या ढीसाळ व नियोजनशून्य कारभारामुळे अर्जुना कालव्याचे काम गेले दोन वर्षे रखडलेले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून कमालीचा संताप व्यक्त करण्यात येत आहे. अधीक्षक अभियंता पाटबंधारे बांधकाम विभाग रत्नागिरी यांनी या कामांकडे लक्ष देण्याची मागणी परिसरातील शेतकर्यांनी केली आहे. www.konkantoday.com