रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या दहा वर्षात खासगी रूग्णालये, दवाखान्यांमध्ये मोठी वाढ

रत्नागिरी जिल्ह्यातील सरासरी आयुर्मानात वाढ झाली आहे. वाढत्या वयात आजार, व्याधी, दुखण्यांचीही वाढ झाली आहे. शासकीय वैद्यकीय सेवा-सुविधा ग्रामीण भागातील लोकसंख्येच्या तुलनेत अपुरी पडत होती. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या दहा वर्षात खासगी रूग्णालये, दवाखान्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दहा वर्षात जिल्ह्यात ९९ रूग्णालये तर १८७ दवाखान्यांची वाढ झाली आहे.रत्नागिरी जिल्ह्यात शासकीय सुविधांतर्गत १२ रूग्णालये, १ विशेष रूग्णालय, ५ दवाखाने, ६५ प्रसुतिगृहे, ६७ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ३७८ प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कार्यरत आहेत. परंतु या ठिकाणी १०४ नियमित वैद्यकीय अधिकार्‍यांची कमतरता आहे.त्याच जोडीला आयुर्मान वाढीनुसार उतार वयातील आजार, व्याधी, दुखणी वाढली आहेत. प्रत्येक घरातील एकातरी व्यक्तीसाठी गोळ्यांचाा डबा संग्रही ठेवावा लागत आहे. अशावेळी खासगी वैद्यकीय सुविधांची गरज वाढत गेली.शहरी भागात खासगी वैद्यकीय सुविधा देणार्‍यांची नोंदणी जिल्हा शासकीय रूग्णालयात तर ग्रामीण भागात सुविधा देणार्‍यांची नोंदणी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात करावी लागते. जिल्हा रूग्णालय आणि जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाकडील नोंदीनुसार सन २०२३ पर्यंत १३९ रूग्णालये आणि ८२१ दवाखाने कार्यरत आहेत. रूग्णालयांमध्ये आंतररूग्ण किंवा रूग्णाला ऍडमिट करून उपचार केले जातात. तर दवाखान्यांमध्ये बाह्य रूग्ण किंवा तपासून डॉक्टर औषधे लिहून देतात.दहा वर्षापूर्वी म्हणजे सन २०१२-१३ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यात गेवळ ४० रूग्णालये होती. ती आता १३९ वर पोहोचली आहेत. दहा वर्षापूर्वी ६३४ दवाखाने होते ते आता ८२१ झाले आहेत. विशेष म्हणजे दहा वर्षापूर्वी मंडणगड, गुहागर, राजापूर तालुक्यांमध्ये एकही रूग्णालय नव्हते. आतता मंडणगडमध्ये २, गुहागरमध्ये ४ आणि राजापुरात ४ रूग्णालये कार्यरत आहेत. यामध्ये रत्नागिरी तालुक्यात १०, चिपळूण ७, दापोली ७, संगमेश्‍वर ५ आणि लांजात ३ रूग्णालयांचा समावेश आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button