
गुहागर बायपास रस्त्याला कचर्याचे ढिगारे, पर्यावरण प्रेमींकडून संताप
मॉर्निंग वॉक करिता प्रसिध्द आणि कायम रहदारी असणारा गुहागर बायपास मार्ग सध्या कचर्याच्या विळख्यात सापडला आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी कचर्याचे ढीग पाहायला मिळत आहेत. यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. चिंतेची बाब म्हणजे या कचर्यामुळे या परिसरात भटक्या श्वानांची संख्यादेखिल वाढत चालली आहे. या प्रकारामुळे पर्यावरणप्रेमींकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. संबंधित प्रशासनाने याकडे गांभिर्यान लक्ष देत येथे कचरा टाकणार्यांवर कडक कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भीमसैनिक युवा प्रतिष्ठानचे आकाश कांबळे यांनी दिला आहे.
www.konkantoday.com




