केबीबीएफ व्यावसायिक संघटनेच्या सदस्यत्वासाठी आवाहन

रत्नागिरी : केबीबीएफ (कऱ्हाडे ब्राह्मण बेनेव्होलंट फाउंडेशन) या समस्त कऱ्हाडे ब्राह्मण व्यावसायिकांच्या संघटनेचे सदस्यत्व स्वीकारण्यासाठी संघटनेतर्फे आवाहन करण्यात आले आहे. या संघटनेचे ठाणे, डोंबिवली, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि नागपूर असे सात विभाग मिळून सुमारे ३२५ व्यावसायिकांचा समावेश आहे. विविध क्षेत्रातील हे व्यावसायिक एकमेकांना अनेक संदर्भ, संपर्क आणि व्यवसाय देत असतात. संघटनेतर्फे दर सहा महिन्यांनी सगळ्या विभागांची एकत्र केबीबीएफ ग्लोबल मीट आयोजित केली जाते. त्यामध्ये व्यवसायाच्या नवीन संधी किंवा सद्यःस्थितीत येत असलेल्या अडीअडचणी यावर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाते. अनेक यशस्वी व्यावसायिक आपले अनुभव सादर करतात आणि या माध्यमातून अनेक नवीन ओळखी होऊन आपला व्यवसाय वाढायला मोठी मदत होते.याव्यतिरिक्त सर्व सदस्यांचा एक ग्लोबल व्हॉटस अॅप ग्रुप आणि वेबसाइटच्या माध्यमातून सर्वजण एकमेकांशी जोडले गेलेले आहेत. या या संघटनेचा एक भाग अर्थात रत्नागिरी विभागाचे सदस्य होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेची यावर्षीची नोंदणी सुरू झाली असून नोंदणीची शेवटची तारीख ३० एप्रिल आहे. ही नोंदणी या आर्थिक वर्षाकरिता असून तीन हजार रुपये सदस्यत्व शुल्क आहे. अधिकाधिक कऱ्हाडे ब्राह्मण व्यावसायिकांनी संघटनेचे सदस्य व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.अधिक माहिती संघटनेच्या https://kbbfglobal.org/ या संकेतस्थळावर मिळू शकेल. तसेच योगेश मुळ्ये (94220 56929), सुहास ठाकूरदेसाई (98222 90859), अभिजित करंबेळकर (94210 79454) किंवा गीता भागवत (8275433735) यांच्याशी संपर्क साधावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button