
स्थानक सुधारले तरी प्रवासी वार्यावर’ असे राजापूर रोड स्थानकाचे आजचे चित्र.
राजापूर स्थानकाचा चेहरामोहरा बदलून स्थानक चकाचक बनले असले तरी प्रवाशांच्या हिताचे काय? किती गाड्यांना राजापूर स्थानकात थांबे मिळतात, हाच खरा कळीचा मुद्दा आहे. प्रत्यक्षात या स्थानकात किरकोळ गाड्यांचे असलेले थांबे आणि सातत्याने काही गाड्यांना थांबे मिळावेत म्हणून झालेले प्रयत्न याबाबत रेल्वेने दाखविलेली अनास्था लक्षात घेता. ‘स्थानक सुधारले तरी प्रवासी वार्यावर’ असे राजापूर रोड स्थानकाचे आजचे चित्र आहे. कोकण रेल्वे प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देणार आहे का हा महत्त्वाचा मुद्दा आहे.
कोकणात रेल्वे सुरु हो ऊन दोन दशकांचा कालखंड लोटला आहे. या दरम्यान कोकणवासीयान्ना मुंबई- पुण्यासह देशाच्या विविध भागात सुखकारक प्रवास करणे शक्य झाले असले तरी राजापुर तालुक्यातील जनतेच्या नशीबी मात्र अजून तरी रेल्वेचा तेवढासा सुखकारक प्रवास करण्याचे भाग्य लाभलेले नाहीएक दोन एक्स्प्रेस गाड्या वगळता लांबपल्ल्यासह हंगामी गाड्यांना नसलेले थांबे…..यामुळे राजापुरवासीयांच्या अडचणी कायम असून त्या केव्हा संपणार आहेत हाच खरा सवाल आहे.