उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री-भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे

मुख्यमंत्री पदाच्या २४ महिन्यापैकी १८ महिने मंत्रालयात न गेलेले उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री असल्याची इतिहासात नोंद होईल असे टीकास्त्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोडले
आज रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या बावनकुळे यांनी रत्नागिरी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते
.शिंदे आणि फडणवीस यांचे सरकार गतिमान असल्याचे सांगतानाच दोन्ही नेते 18 तास काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले
 शिंदे गटासोबत ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत प्रत्येक निवडणुकीत युती करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
तळकोकणातील संघटनात्मक कामाचा आढावा, पक्षाला बळकटी देणे यासाठी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे दोन दिवसाच्या कोकण दौऱ्यावर आले आहेत. शुक्रवारी रत्नागिरीत पत्रकार परिषदेत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतानाच शिंदे फडणवीस सरकारचे कौतुक केले.
राज्यात योजनाबद्ध काम करुन ४५ हून अधिक लोकसभेच्या आणि २०० पेक्षा अधिक विधानसभेच्या जागा मिळवू, असा दावा त्यांनी केला. इथून पुढे प्रत्येक निवडणूक शिंदे शिवसेनेसोबत युतीने लढवली जाईल, असे ते म्हणाले.राज्यात योजनाबद्ध काम करुन ४५ हून अधिक लोकसभेच्या आणि २०० पेक्षा अधिक विधानसभेच्या जागा मिळवू, असा दावा त्यांनी केला. इथून पुढे प्रत्येक निवडणूक शिंदे शिवसेनेसोबत युतीने लढवली जाईल, असे ते म्हणाले.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना लोकांमध्ये मिसळले नाहीत. त्यांनी जनतेशी फेसबुकवरुनच संवाद साधला. मंत्रिमंडळाच्या बैठकाही त्यांनी ऑनलाईनच घेतल्या. २४ महिन्याच्या आपल्या मुख्यमंत्री पदाच्या काळात १८ महिने ते मंत्रालयात गेलेच नाहीत. आमदार म्हणून आपण विलासराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाल पाहिला आहे. आमदारांच्या पत्रावर  तातडीने निर्णय घेतले असल्याचे आपण पाहिले आहे. मात्र उद्धव ठाकरे यांनी कुठल्याही आमदाराच्या पत्रावर तत्काळ निर्णय घेतलेला नाही. एकीकडे राष्ट्रवादीने सगळी सत्ता ताब्यात घेतली होती त्यामुळे त्यांच्या लोकांची कामे होत होती त्यामुळेच नाराज झालेल्या त्यांच्या पक्षातील आमदारांना हा निर्णय घेऊन सरकार बद्दल निर्णय घ्यावा लागला
फुटलेल्या आमदारांनी आधी राजीनामे देऊन जनतेसमोर जाऊन निवडून यावे असे शिवसेनेचे नेते म्हणत असल्याचे पत्रकारांनी विचारले असता प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले या निवडणुकीत जनतेने भाजप शिवसेना युतीच्या बाजूने कल दिला होता परंतु तसे असताना देखील शिवसेना महाविकास आघाडीत सामील झाले त्यावेळी त्यांनी राजीनामे देऊन जनतेसमोर का गेले नाहीत असाही सवाल त्यांनी केला
सध्या जिल्ह्यात भाजपाची ताकद कमी असल्याचे त्यांनी मान्य केले आहे मात्र आपण ही ताकद वाढवण्यासाठी पूर्ण  करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button