किराणा व जनरल स्टोअर्स दुकानाला अचानक आग लागून लाखो रुपयांचे नुकसान

संगमेश्‍वर तालुक्यातील करंबेळे गोताडवाडी येथे किराणा व जनरल स्टोअर्स दुकानाला अचानक आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणल्यामुळे पोस्ट ऑफिस आगीतून बचावले आहे. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.करंबेळे गोताडवाडी येथे तानाजी सखाराम गार्डी यांच्या किरणा व जनरल स्टोअर्स दुकानाला सोमवारी मध्यरात्री १.३० च्या सुमारास आग लागली. याचवेळी कनकाडी सरपंच बंटी गोताड व ग्रामस्थ सांस्कृतिक कार्यक्रम पाहून घराच्या दिशेने येत होते. त्यांना गार्डी यांच्या दुकानाला आग लागल्याचे दिसले. दुकानामध्ये सामान असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले. ग्रामस्थांनी दुकानाचा पाठिमागील दरवाजा फोडून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत किरणा व जनरल स्टोअर्सचे साहित्य, टिव्ही, फ्र्रीज, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जळून खाक झाल्या. या घटनेचा तलाठी खटके व ग्रामसेवक चौगुले आदींनी मंगळवारी सकाळी पंचनामा केला. यात गार्डी यांचे सुमारे २ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button