वैभववाडी नगरपंचायतीवर भाजपचे वर्चस्व तर कुडाळ नगरपंचायतीत सत्तेच्या चाव्या कॉंग्रेसचे हातात

रअत्यंत्य प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या सिंधुदुर्गातील वैभववाडी आणि कुडाळ नगरपंचायतीचे निकाल देखील हाती आले आहेत.या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. या दोन नगपंचायतीत भाजप विरुद्ध शिवसेना असाच थेट सामना रंगल्याचे पाहायला मिळाले होते. यामध्ये वैभववाडी नगरपंचायतीवर भाजपने वर्चस्व मिळवले आहे, तर कुडाळ नगपंचायतीत मात्र भाजपला अपेक्षीत यश मिळवता आले नाही.
सिंदुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी आणि कुडाळ नगरपंचायतीची निवडणूक ही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासाठी प्रतिष्ठेची निवडणूक मानली जात होती. या निवडणुकीत त्यांनी विशेष लक्ष घातले होते. त्याप्रमाणे वैभववाडी नगरपंचायतीवर नारायण राणेंच्या गटाने वर्चस्व राखले आहे. वैभववाडी नगरपंचायतीत 17 जागांपैकी भाजपला 10 जागा मिळाल्या आहेत. तर शिवसेनेला 5 जागा मिळाल्या आहेत. तर अपक्षांच्या वाट्याला दोन जागा मिळाल्या आहेत. वैभववाडी नगरपंचायतीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला खाते खोलता आले नाही.
दुसरीकडे नारायण राणे विरुद्ध शिवसेना असा सामना रंगलेल्या कुडाळ नगपंचायतीत 17 जागांपैकी भाजपला 8 जागा मिळाल्या आहेत. शिवसेना 7 जागा तर काँग्रेसला 2 जागा मिळाल्या आहेत. जरी सर्वांत जास्त जागा भाजपला मिळाल्या असल्या तरी राणेंना तिथे एकहाती सत्ता मिळवा आली नाही. या नगरपंचायतीवर कोणाची सत्ता येणार हे सध्या सांगता येत नाही. कारण काँग्रेसच्या पाठिंबा कोणाला मिळणार यावर सत्तेची गणित अवलंबून राहणार आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button