राजापूर शहरातील पेट्रोलपंप ते वरचीपेठ पूल दरम्यानच्या बंद स्थितीतील  पथदीप सुरू

मुंबई-गोवा महामार्गावरील राजापूर शहरातील पेट्रोलपंप ते वरचीपेठ पूल दरम्यानच्या बंद स्थितीतील स्ट्रीटलाईट सुरू व्हावी, यासाठी बाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अरविंद लांजेकर यांनी सातत्याने सुरू ठेवलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. शुक्रवारी सायंकाळपासून अर्जुना नदीवरील सर्वाधिक उंचीचा पूल ते एसटी डेपोसमोरील पूल या परिसरातील स्ट्रीटलाईट अखेर अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सुरू झाल्याची माहिती लांजेकर यांनी दिली.राजापूर तालुक्यातून गेलेल्या मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. रस्त्याच्या पूर्ण झालेल्या कामांमुळे गाडयांना भरधाव वेगाने व सुरक्षितपणे मार्गक्रमण करणे आता अधिक सोयीचे अन सुलभ झाले आहे. मात्र दुसर्‍या बाजूला महामार्गाचे बहुतांश काम पूर्ण झाले असले तरी रस्त्याच्या कामात अनेक ठिकाणी त्रुटी राहिल्या आहेत.  www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button