
आपण कोरोनासोबत जगायला शिकले पाहिजे-केंद्रीय सहसचिव लव अग्रवाल
देशभरात कोरोना बाधितांचा आकडा 56 हजारांच्या पुढे गेला असून आतापर्यंत 1886 लोकांचा यात बळी गेलाय. मागच्या 24 तासांमध्ये तब्बल 3390 नवीन लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातच केंद्रीय सहसचिव लव अग्रवाल यांचे एक महत्वाचे वक्तव्य समोर आले आहे. आपण कोरोनासोबत जगायला शिकले पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान, मुंबईतील वाढती कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या पाहता केंद्राची टीम दर आठवड्याला मुंबईत येणार आहे. आज या टीमसोबत सहसचिव लव अग्रवाल आले होते.
www.konkantoday.com