संगमेश्वर येथे दुपारी विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी मुसळधार पाऊस
संगमेश्वर परिसरात आज शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाने जोरदार वाऱ्यासह हजेरी लावली. सकाळपासून ढगाळ वातावरण होते. त्यामुळे पाऊस पडण्याची दाट शक्यता वाटत होती. अचानक पावसाने हजेरी लावल्याने अनेकांची तारांबळ उडाली. दुपारच्या दरम्यान संगमेश्वर तसेच लोवले, बुरंबी, माभळे, असुर्डे, आदी गावांत काही ठिकाणी अवकाळी पावसाने हलक्या सरीने तर काही गावांत गडगडाटासह जोरदार वाऱ्याने तासभर हजेरी लावली www.konkantoday.com