खेड येथील गोदामाची मोठ्या प्रमाणावर पडझड पुनर्बांधणीचा पत्ता नाही

खेड तहसील कार्यालयाच्या अन्नधान्य पुरवठा विभागामार्फत तालुक्यातील लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना वितरित करण्यासाठी येणार्‍या धान्याची साठवणूक करण्यासाठी समर्थनगर येथे असलेल्या दोन धान्य गोदामांपैकी एका गोदामाची पूर्णतः पडझड झाली आहे. दोन वर्षाचा कालावधी लोटून देखील गोदामाच्या पुनर्बांधणीसाठी वरिष्ठ पातळीवरून अद्याप कोणतीच दखल घेण्यात आलेली नाही.ब्रिटीशांच्या राजवटीत शहरातील सैनिकी मुलांच्या वसतीगृहासमोर ४३६८ चौरस फूट क्षेत्रात जमिनीपासून एक ते दीड फूट क्षेत्रात जमिनीपासून एक ते दीड फूट उंचीवर दगडी चिरा, पत्रे व लाकडावर सहाय्याने बांधण्यात आलेल्या गोदामात १९२७ पासून धान्याचा साठा केला जात होता. या गोदामाची ५०० मेट्रीक टन धान्य साठवणूक क्षमता होती. या गोदामालाच २२० चौरस फूट क्षेत्रात धान्याची नोंदी ठेवणारे छोटेखानी कार्यालय आहे.९५ वर्षाच्या गोदामाच्या डागडुजीसाठी तहसील कार्यालयामार्फत वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे पत्रव्यवहारासह स्मरणपत्र पाठवण्यात आले होते. तत्कालीन अर्थमंत्री सुनील तटकरे, आमदार योगेश कदम यांनी देखील गोदामाच्या दुरूस्तीसाठी पाठपुरावा केला होता. २०१० मध्ये लाहोर गोदामाच्या तातडीने  दुरूस्तीसाठी २१ लाखांचा, २०१३ मध्ये २४ लाखांचा तर २०१९ मध्ये ५४ लाख ७५ हजार रुपयांची अंदाजपत्रकेही तयार करण्यात आली होती. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button