आपण अडीच लाख मतांनी विजयी होऊ- महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना विश्वास

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने एकत्रित भव्य शक्तिप्रदर्शन करत प्रचार रॅली काढून हा उमेदवारी अर्ज दाखल केला. आपण अडीच लाख मतांनी विजयी होऊ, असा विश्वास उमेदवारी अर्ज भरल्यानंतर माध्यमांजवळ बोलताना राणे यांनी व्यक्त केला आहे.यावेळी झालेल्या कॉर्नर सभेत बोलताना राणे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकल्प केला आहे की यावेळी भाजप आणि मित्रपक्ष मिळून ‘अब की पार चारशे पार’ यासाठी रत्नागिरी सिंधुदुर्गचा खासदार असायला हवा विकसित भारतासाठी मोदी हॅटट्रिक साधत तिसर्‍यांदा पंतप्रधान होतील. रत्नागिरी सिंधुदुर्गचा महायुतीचा खासदार अडीच लाखपेक्षा जास्त मतांनी निवडून द्याल, यासाठी तुमच्या तोंडात साखर पडो असा विश्वास राणे यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मंत्री दीपक केसरकर, रवींद्र चव्हाण, किरण सामंत आदी मान्यवर उपस्थित होते. प्रचार रॅलीत किरण सामंतही उत्साहाने सहभागी झाले होते. पालकमंत्री उदय सामंत ही उपस्थित होते मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते उपस्थित होते त्यामुळे अनेक ठिकाणी शहरात वाहतूक कोंडी झाली होतीwww.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button