नियमित गाड्यांना होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी उन्हाळी स्पेशल फेर्‍यांची संख्या पोहोचली २९० वर

उन्हाळी सुट्टीचा हंगाम सुरू झाल्याने कोकण मार्गावरून धावणार्‍या नियमित गाड्यांना होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने आतापर्यंत तब्बल उन्हाळी स्पेशलच्या २९० फेर्‍या जाहीर करत चाकरमान्यांसह पर्यटकांना दिलासा दिला आहे. यामध्ये १६ वातानुकुलीत फेर्‍यांचाही समावेश आहे. एकीकडे एकापाठोपाठ एक उन्हाळी स्पेशल जाहीर केल्या जात असतानाच दुसरीकडे एक्सप्रेस गाड्यांना अतिरिक्त डबे जोडण्याचा सपाटाही सुरूच असल्याने पर्यटक सुखावले आहेत.उन्हाळी सुट्टीसाठी बरेचजण कुटुंबासह गावी येण्याचे नियोजन करतात. याशिवाय सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी कोकणातून मुंबईला जाणार्‍या प्रवाशांचीही संख्या तितकीच असते. गाड्या विक्रमी गर्दीने धावत असतात. कोकण मार्गावरून धावणार्‍या रेल्वेगाड्यांना होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे यंदाही पुढे सरसावली आहे. यापूर्वी कोकण मार्गावर २५८ फेर्‍या जाहीर केलेल्या असतानाच दोन एलटीटी-थिविम उन्हाळी स्पेशलच्या ३२ फेर्‍याही जाहीर केल्याने फेर्‍यांची संख्या २९० वर पोहोचली आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button