कोळकेवाडी धरणाच्या पाणीपातळी नियंत्रणासाठी तज्ञ समिती स्थापन करा

गुहागर आणि चिपळूण तालुक्याची नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन बैठक चिपळूण शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात प्रांताधिकारी आकाश लिंगाडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत २००५ व २०२१ च्या पूरपरिस्थितीची माहिती पॉवरपॉईंटद्वारे उपस्थितांना देण्यात आली. आपत्तीवेळी करावयाच्या उपाययोजना, घ्यावयाची खबरदारी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कोळकेवाडी धरण व्यवस्थापन व महाजनकोच्या अधिक्षक अभियंत्यांना पूर परिस्थितीमध्ये जनरेशन कशा प्रकारे करावे, याबाबतच्या सूचना देण्यात आल्या. या बैठकीत संभाव्य अतिवृष्टी व पूर कालावधीत कोळकेवाडी धरणाची पातळी शक्यतोवर १३२.५ मी. किंवा त्यापेक्षा खाली ठेवण्यासाठी तज्ञ समिती स्थापन करण्याच्या सूचना दिल्या. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button