नाणिज क्षेत्री उद्या रामनवमी उत्सव

*नाणीजक्षेत्री उद्याश्रीराम नवमी उत्सव* जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थांनतर्फे बुधवारी (ता. 17) श्रीरामनवमी वारी उत्सव सोहळा साजरा करण्यात आला आहे. या निमित्त रामजन्म सोहळ्याबरोबर अन्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या सोहळ्याची सुरवात मंगळवारपासून होत आहे. बुधवारी सकाळी नैमित्तिक धार्मिक विधी आणि चरणदर्शन सोहळा होईल. सकाळी ११.३० ते दुपारी १ या वेळेत सुंदरगडावरील प्रभू श्रीराम मंदिरात जन्मोत्सव सोहळा होईल. या वेळी सजवलेल्या पाळण्यात बाळ श्रीरामाला ठेवून पाळणा व रामगीते तसेच आरती केली जाईल. त्याचबरोबर इतर धार्मिक कार्यक्रम होतील. दुपारी ३ ते ५ या वेळेत चरणदर्शन व धर्मक्षेत्र मासिकासाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्हे व पिठांचा सत्कार होईल. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button