सात लाखांचे चेक वटले नाहीत, आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

घराचे साहित्य विकत घेतले पण त्यासाठी दिलेले चेक वटले नाहीत बाऊन्स झाले म्हणून आरोपी परशुराम पवार व प्रीतम पवार राहणार खेर्डी चिपळूण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील फिर्यादी राजेंद्र घोसाळकर राहणार जामसूद आयुष्य फार्म गुहागर यांचेकडून प्रीतम पवार यांनी घरासाठी लागणारे उपयुक्त साहित्य विकत घेतले परंतु त्याचे पैसे नंतर देतो असे सांगून पैसे दिले नाहीत हे साहित्य त्याने आपल्या कंपनी करता वापरले यामुळे यातील पर्शराम पवार यांनी पैशाची जबाबदारी घेऊन फिर्यादी घोसाळकर यांना सात लाखांचे पाच धनादेश दिले फिर्यादींनी हे धनादेश बँकेत टाकले परंतु बँकेत हे चेक वटले नाहीत व बाऊन्स झाले यामुळे या दोघांनी आपली फसवणूक केल्याची तक्रार घोसाळकर यांनी गुहागर पोलीस स्थानकात केली त्यामुळे वरील दोघांविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे .
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button