कोकण रेल्वेच्या न थांबणार्या गाड्या चिपळूणमध्ये थांबवा आणि पाहिजेत तेवढे पाणी घ्या- शौकतभाई मुकादम
कोकणातील काही रेल्वे स्टेशनला टँकरद्वारे विकत पाणी घ्यावे लागत आहे. ही केवढी मोठी नामुष्की आहे. हे संकट रेल्वे प्रशासनाने स्वतःहून ओढावून घेतले आहे. चिपळूणच्या जंक्शन रेल्वे स्टेशनवर २० वर्षापूर्वी कोकण रेल्वेचे माजी चेअरमन धरण बी. राजाराम व श्री. गोखले यांनी चिपळूणच्या जंक्शन रेल्वे स्टेशनवर सर्व सुपरफास्ट गाड्या थांबविण्यात येतील असे लेखी पत्र कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीला दिले होते. त्याची अंमलबजावणी होत नसल्यामुळे पाणी टँकरद्वारे विकत घ्यावे लागत आहे, अशी कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकतभाई मुकादम यांनी रेल्वे प्रशासनाला पुन्हा आठवण करून दिली आहे. www.konkantoday.com