
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील आरवली पूल अखेर वाहतुकीसाठी खुला
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील आरवली पूल अखेर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील आरवली ते बावनदी हे अपघातप्रवण क्षेत्र आहे. या अपघातप्रवण क्षेत्रामध्ये दिवसाआड अपघात होत असतात. चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे, मात्र संथगतीने सुरू असलेल्या या कामामुळे वाहनचालक आणि प्रवासीवर्गाला नाहक त्रास सहन करावा लागतो. आरवली येथील ब्रिटीशकालीन पूल हा धोकादायक बनलेला होता. अपघातप्रवण क्षेत्रात येणारा हा पूल लवकरात लवकर करण्यात यावा, अशी मागणी होत होती. पावसाळ्याअगोदर अखेर हा पूल वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे.www.konkantoday.com