उन्हाळ्यात शरीरासाठी अत्यंत लाभदायक ताक
सध्या कडक उन्हाळा सुरू असून या ऋतूमध्ये स्वत:ला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी आरोग्यदायी गोष्टींचे सेवन करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. तुम्हालाही या उन्हाळ्यात उष्णतेची लाट आणि पाण्याची कमतरता टाळायची असेल, तर तुम्ही रोज एक ग्लास ताक पिऊ Benefits of buttermilk शकता. त्यापासून अनेक लाभ मिळतात, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.दह्यापासून ताक Benefits of buttermilk तयार केले जाते. व्हिटॅमिन ए, बी, सी आणि ई सारखे अनेक प्रकारचे पोषक घटक ताकामध्ये आढळतात. जे शरीराला अनेक समस्यांपासून वाचवण्यास मदत करते. ताक हे एक सुपर हेल्दी पेय आहे, जे उष्णतेपासून संरक्षण आणि शरीराला थंड ठेवते. चला तर मग विलंब न लावता जाणून घेऊया. उन्हाळ्यात ताक पिण्याचे फायदे – पाण्याची कमतरता भासत नाही. ताक हे पोषक तत्त्वांचे भांडार आहे. त्यात मीठ, साखर आणि पुदिना टाकून प्यायल्याने डिहायड्रेशन, डायरिया आणि उष्णता टाळता येते. या पेयाचे सेवन केल्याने पाण्याची कमतरता भासत नाही.उन्हाळ्यात याचे सेवन केल्याने चरबी लवकर जाळली जाऊ शकते. त्वचा निरोगी राहते-