
मोदी आवास योजनेचे हप्ते थकले, घरकुल अनुदानासाठी लाभार्थी मारताहेत हेलपाटे
नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) मोदी आवास योजना राबवली जात आहे. या योजनेचा लाभ घेणार्या अर्ध्याहून अधिक लाभार्थ्यांनी आतापर्यंत आपल्या घरांचे बांधकाम पूर्णत्वास नेले तर काहींची कामे प्रगतीपथावर आहेत. दोन महिन्यांवर पावसाळा येवून ठेपला आहे. अशा परिस्थितीत शासनाकडून केवळ पहिला पंधरा हजार रुपयांचा एकच हप्ता संबंधित लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झाला आहे. उर्वरित अनुदान रखडले आहे. त्यामुळे लाभार्थी मोठ्या पेचात सापडले असून अनुदान मिळविण्यासाठी त्यांना चिपणूण पंचायत समितीत हेलपाटे मारावे लागत आहेत.ओबीसी समाजातील घरापासून वंचित असलेल्या लोकांना हक्काचा निवारा देण्यासाठी केंद्र सरकारने मोदी आवास योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी रत्नागिरी जिल्ह्यात ६ हजार ३५६ लाभार्थ्यांची निवड झाली होती. या योजनेतून मंजूर झालेल्या घरकुलांना सुरूवातीचा पहिला १५ हजाराचा हप्ता वेळेत मिळाला नाही. www.konkantoday.com