
सख्ख्या मेहुणीवर मातृत्व लादणार्याला अटक_____
संगमेश्वर तालुक्यातील देवरूख येथे सख्ख्या मेहुणीशी शरीरसंबंध प्रस्थापित करून मातृत्व लादल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित तरूणने या प्रकरणी देवरूख पोलिसांत तक्रार दाखल केली असून त्यानुसार पोलिसांनी संशयिताविरूद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. तसेच पुढील तपासासाठी पोलिसांकडून संशयिताला अटक करण्यात आली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपी याला लहान मूल असल्याने पत्नीच्या मदतीसाठी मेहुणी घरी वास्तव्याला आली होती. या काळात पत्नी घराबाहेर गेल्याचा फायदा उठवत संशयिताने पीडितेशी जबरदस्तीने शरीरसंबंध प्रस्थापित केले, अशी तक्रार देवरूख पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. दरम्यान जुलै २०२३ रोजी पीडिता ही आपल्या मूळ गावी परतली, यावेळी तिला अस्वस्थता जाणवू लागल्याने नातेवाईकांनी शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले.वैद्यकीय अधिकार्यांनी चिकित्सा करण्यासाठी पीडितेची सोनोग्राफी करण्यास नातेवाईकांना सांगितले सोनोग्राफीमध्ये पीडिता ही गर्भवती असल्याचे समोर आले. आपली अविवाहित मुलगी गर्भवती असल्याचे समजताच पालकांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यानंतर तक्रार दाखल करण्यात आली www.konkantoday.com