रत्नागिरी-कुवारबांव रस्त्यावरील सिंचनभवन येथे मोटारसायकलच्या धडकेत रिक्षा उलटली, चालक जखमी
रत्नागिरी-कुवारबांव रस्त्यावरील सिंचनभवन येथे मोटारसायकलच्या धडकेत रिक्षा उलटून अपघात झाला. ही घटना शनिवारी दुपारी १ च्या सुमारास घडली. या अपघातात रिक्षा चालक संदेश मारूती चव्हाण (६५, रा. जुवे, रत्नागिरी) जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालय येथे दाखल करण्यात आले.पोलिसांच्या माहितीनुसार संदेश चव्हाण हे ३० मार्च २०२४ रोजी आपल्या रिक्षात (एमएच ०८ के ३७५९) प्रवासी भरून डीमार्ट येथे गेले होते. दुपारी १ च्या सुमारास प्रवासी सोडून पररत येत असताना चव्हाण हे सिंचन भवनसमोरील रस्त्यावरून वळवत होते. यावेळी कुवारबाव ते रत्नागिरीच्या दिशेने येणार्या मोटारसायकलची रिक्षाला धडक बसली. यामध्ये रित्रा ही जागेवरच उलटून अपघात झाला. यात चव्हाण जखमी झाले. या अपघाताची नोंद शहर पोलिसांत झाली आहे. www.konkantoday.com