
रत्नागिरी जिल्ह्यातील ८४६ ग्रामपंचायतींना हिरवे कार्ड
पाऊस सुरू झाल्याने साथ रोगांचा फैलाव होवून नागरिकांचे आरोग्य बिघडते. या साथ रोगांमध्ये पाण्याची भूमिका महत्वाची असते. यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभाग, पाणी स्वच्छता विभागातर्फे विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. दरवर्षी जलस्त्रोतांची तपासणी करून लाल, पिवळे व हिरवे कार्ड ग्रामपंचायतींना दिले जाते. यावर्षी जि.प.ने केलेल्या जलस्त्रोत तपासणीत जिल्ह्यातील एकाही ग्रामपंचायतीला लाल किंवा पिवळे कार्ड देण्यात आले नाही. सर्वच्या सर्व ८४६ ग्रामपंचायतींना हिरवे कार्ड देण्यात आले आहे.पावसाळा सुरू झाला की, पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांमध्ये दूषित पाणी मिसळते. त्यामुळे गावात साथ रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यामुळे पाणी दुषित होवू नये, यासाठी ग्रामपंचायतीतर्फे लोकसहभागातून विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. www.konkantoday.com