
रत्नागिरीचा प्रथमेश भाटकर बिग बॉसच्या जाहिरातीत चमकणार
रत्नागिरी ः महाराष्ट्रभर सध्या बिग बॉसचा दरारा आहे. कलर्स मराठी वाहिनीवर दररोज रात्री ९.३० वा. लागणार्या या कार्यक्रमाची हवा यातील कलाकारांमधील वाढत्या भानगडीमुळे अधिक होवू लागली आहे. या कार्यक्रमाची क्रेझ वाढण्याचे आणखी एक कारण आहे. रत्नागिरीतील कुरतडे गावचा मुलगा अभिनेता प्रथमेश भाटकरची निवड झाली आहे. अभिनेता महेश मांजरेकर यांच्यासोबतची बिग बॉसची जाहिरात त्याच्यासाठी महत्वपूर्ण आहे.
या कार्यक्रमाची व्हायकॉमद्वारे करण्यात आलेली जाहिरात. या जाहिरातीत बिग बॉसचे अँकर महेश मांजरेकर हे भाई झालेत आणि विशेष म्हणजे त्यांच्यासमोर बसणारा मुलगा आहे रत्नागिरीचा उभरता अभिनेता प्रथमेश भाटकर, बिग बॉस-१ च्या जाहिरातीनंतर आता सिझन-२ च्या जाहिरातीसाी अभिनेता प्रथमेशला वूटवरून स्वतःहून निमंत्रण आले आहे.