झाडावरून पडल्याने लांजा-अंजणारी येथील तरूणाचा मृत्यू

लांजा तालुक्यातील अंजणारी येथील तरूण झाडावरून पडून गंभीर जखमी झाला. अधिक उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी ६ एप्रिल रोजी दुपारी १२.३० वा. सुमारास मठ-वणकेवाडी येथे घडली होती.शंकर विश्राम नरीम (३४, रा. अंजणारी नरीमवाडी, ता. लांजा) असे मृत झालेल्या तरूणाचे नाव आहे. शनिवारी नरीम हा झाडावर चढून झाडाच्या फांद्या तोडत असताना खाली पडला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. नातेवाईकांनी पाली येथे दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले. सायंकाळी ६.४५ वा. सुमारास त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी जिल्हा रूग्णालयाच्या पोलीस चौकीत नोंद करण्यात आली आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button