खेड तालुक्यातील आंबवली येथे शासकीय जागा कमी दरात देण्याचे आमिष दाखवत ३२ लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल
शासनाच्या जागा कमी दरात मिळवून देण्याचे आमिष दाखवत यासाठी जमिनींचे रजिस्ट्रेशन करण्याची गरज नसल्याचे सांगून ३२ लाख १६ हजार १०० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अनिल अंकुश राणे (रा. आंबवली) याच्यावर गुरूवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २०१४ ते २०२३ या कालावधीत घडल्याचे फिर्यादीने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.यातील संशयित अनिल राणे याने २०१४ ते २०२३ पासून म्हाळुंगे गट नं. ४६६, ४१०, आंबवली गट नं. १७५२ (अ), १७५२ (ब), १७५२ (क), १७५२ (ड), ऐनवली गट नं. ०७, वरवली गट नं. ९५२ ही जागा विक्री करणार असल्याचे सांगितले. या जागेसाठी फिर्यादी व फिर्यादीचे पती यांनी आरटीजीएस, फोन पे एनईएफटी, धनादेश, रोख स्वरूपात ३१ लाख ८४ हजार १०० रुपये संशयितास दिले.तसेच आंबवली गट नं. १७५२ (अ), १७५२ (ब), १७५२ क), १७५२ (ड), ऐनवली गट नं. ०७, वरवली गट नं. ९५२ या शासनाच्या जागा कमी दरात मिळवून देतो, असे खोटे सांगून जमिनीचे रजिस्ट्रेशन करण्याची काही गरज नसल्याचे भासवले. फिर्यादीच्या नावे हस्तलिखित स्वरूपाचे आंबवली गट नं. १७५२ (अ), १७५२ (ब), १७५२ (क), १७५२ (ड) ऐनवली गट नं. ०७, वरवली गट नं. ९५२ या गटाचे बनावट हस्तलिखित सातबारे देत बनावट नोटीस देवून ३२ लाख १६ हजार १०० रुपयांची फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.www.konkantoday.com