
कोकण रेल्वे मार्गावरून धावणार्या मांडवी एक्सप्रेसच्या वेळापत्रकातही बदल
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाट विस्तारिकरणाच्या कामासाठी घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकमुळे कोकण मार्गावरून धावणारी मडगाव-सीएसएमटी मुंबई मांडवी एक्सप्रेस पनवेल स्थानकापर्यंत धावत आहे. या पाठोपाठ एक्सप्रेस सुटण्याच्या वेळेतही बदल करण्यात आल्याचे कोकण रेल्वे प्रशासनाने बुधवारी जाहीर केले.१०१०४ क्रमांकाची मडगाव-सीएसएमटी मुंबई मांडवी एक्सप्रेस बुधवारपासून २ जूनपर्यंत १ तास १५ मिनिटे उशिराने धावणार आहे. या कालावधीत एक्सप्रेस मडगाव स्थानकातून सकाळी ९.१५ सुटण्याऐवजी सकाळी १०.३० वा. सुटेल. या बदलाची प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाने केले आहे. www.konkantoday.com