फडणवीस देखील म्हणाले रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचा उमेदवार महायुतीचाच
लोकसभा निवडणूक उंबरठ्यावर येवून ठेपली असताना रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचा उमेदवार कधी जाहीर होणार, या बाबत अजूनही सार्या राजकीय वर्तुळाला प्रतीक्षा लागून राहिली आहे. रत्नागिरी दौर्यावर आलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उमेदवार जाहीर करून जातील अशी आशा होती, पण महायुतीचाच उमेदवार लढणार आणि चिन्ह महायुतीचेच असणार इतकेच पत्रकारांसमोर बोलून पुढील दौर्याला मार्गस्थ झाले.रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी महायुतीचा उमेदवार कोण असणार याकडे सार्यांच्या नजरा खिळल्या आहेत. भाजपकडून या जागेसाठी दावेदारी केली गेली आहे. तशीच शिवसेनेकडूनही या मतदार संघात उमेदवारीचा हक्क असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे येेथील उमेदवार महायुतीचाच असणार, हे सर्व राजकीय वर्तुळाला ठाऊक झाले आहे. पण तो उमेदवार शिवसेना की भाजपचा याबद्दल अजूनही सस्पेन्स कायम राहिला आहे. www.konkantoday.com