
दिवंगत भाजप नेते विजयराव सालीम यांच्या कुटुंबाला भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब याचेकडून 5 लाख रु. ची मदत.
या बाबत सविस्तर वृत्त असे की गेल्या वर्षी भाजप नेते माजी जि प. शिक्षण सभापती विजयराव सालीम अचानक अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले..पक्षासाठी अहोरात्र मेहनत घेणारा कार्यकर्ता हरपला याच्या वेदना संवेदनशील नेता भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेबांना होत होत्या..मग या कुटुंबासाठी आपण काहीतरी करावे असे त्यांना सतत वाटत होते..त्यावेळी त्यांना कळले की विजय राव सालीम यांची कन्या सी.ए. चे शिक्षण घेत आहे..मग तिच्या शिक्षणात खंड पडू नये व सर्व शिक्षण पूर्ण व्हावे म्हणून मुलगी ज्ञानेश्वरी च्या नावावर 5 लाख रु. डिपॉजिट केले..या रक्कमेचे वर्षाला 52000/- व्याज मिळणार आहे..ही डिपॉजिट स्लीप भाजप जिल्हा अध्यक्ष राजेश सावंत, यांच्या हस्ते सालीम कुटुंबाला देण्यात आली.
यावेळी भाजप तालुका अध्यक्ष दक्षिण दादा दळी, सरचिटणीस उमेश देसाई, महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा वर्षाताई ढेकणे, शहर अध्यक्ष दादा ढेकणे, ग्रा.प. सदस्या आर्या सावंत, अमोल सावंत, ययाति शिवलकर, दीपक पाटील, विजय सावंत, स्वरूप सावंत व सालीम कुटुंबीय उपस्थित होते.