
रत्नागिरी जिल्ह्यातील ३१ रेशन दुकानदारांचे परवाने झाले कायम, संघटनेला यश
रत्नागिरी जिल्ह्यातील ३१ रास्त भाव दुकानदारांना देण्यात आलेले तात्पुरत्या स्वरूपातील परवाने कायमस्वरूपी करण्यात आले आहेत. एक विशेष बाब म्हणून शासनाने नुकतीच मान्यता दिली आहे. याचा दुकानदारांना फायदा होणार आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्हा रेशन दुकानदार संघटनेच्या प्रयत्नांना यश आले असल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक कदम यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.पत्रकात म्हटले आहे की, जिल्ह्यात ३१ दुकानदारांना २००१ ते २०१७ या काळात तत्कालीन जिल्हा पुरवठा अधिकाारी व जिल्हाधिकाारी यांच्या आदेशाने तात्पुरत्या स्वरूपात रास्तभाव धान्य दुकानांचे व्यवस्थापन मंजुर करण्यात आले होते. पाच तात्पुरते आदेशाच्या आधारे आजतागायत संबंधितांकडे वितरण व्यवस्थापन आहे. त्यामुळे बर्याच वर्षापासून संबंधित ही दुकाने चालवत असून त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन ही दुकानेच आहेत.या दुकानदारांनी कोरोना काळात चांगली सेवा दिली. त्यामुळे त्यांचे परवाने कायम व्हावेत यासाठी संघटना प्रयत्न करीत होती. यातूनच काही दिवसांपूर्वी जिल्हाध्यक्ष अशोक कदम, रमेश राणे यांनी अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेवून चर्चा केली होती. www.konkantoday.com