शहरातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी लोकप्रतिनिधी सरसावले

रत्नागिरी शहरासाठी पाणीपुरवठा करणार्‍या धरणात पाणी उपलब्ध असून देखील नियोजनाअभावी शहराला काही भागात पाणीपुरवठा होऊ शकत नाही त्यामुळे नागरिकांच्या नाराजी निर्माण झाली असतानाच आता नगरपालिकेतील लोकप्रतिनिधीटंचाई दूर करण्यासाठी सरसावले आहेत नगर परिषदेचे प्रशासन आपणाला सहकार्य करीत नसल्याची तक्रार पाणी सभापती सोहेल मुकादम यांनी यापूर्वी केली होती त्यामुळे प्रशासना विरुद्धही कडक धोरण लोकप्रतिनिधींनी अवलंबले आहे पावसाळा सुरू होऊन जोपर्यंत पाणीपुरवठा व्यवस्थित सुरू होत नाही तो करण प्रशासनासह पाणी विभागाच्या एकाही अधिकाऱ्याने सुट्टी घेऊ नये सुट्टी घेतल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असे आदेश नगराध्यक्षांनी दिले आहेत शहरातील अनेक भागात दोन ते तीन दिवस पाणी मिळत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत पाण्यातील अनियमिततेवर मात करण्यासाठी सहा टँकर लावण्यात आले आहेत मात्र त्यात नियोजन नसल्याने अनेक भागात पाणी मिळत नाही याचा रोष जनता लोकप्रतिनिधींवर काढत आहेत त्यामुळे या विषयावर तातडीची बैठक नगरपालिकेत पार पडली या बैठकीत आरोग्य खात्यालाही फैलावर घेण्यात आले एक जून पासून रत्नागिरी शहरातील सर्व गटारे स्वच्छ करून त्यावर डास प्रतिबंधक फवारणी करण्यात यावीअसेही आदेश या बैठकीत देण्यात आले

Related Articles

Back to top button