पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते शिरगांव येथील विविध विकास कामांची भूमिपूजन शहराजवळील गावातील महिलांना एसटी मध्ये लवकरच मिळणार ५०% सवलत:- उदय सामंत
_राज्याचे उद्योगमंत्री रत्नागिरी रायगडचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते रत्नागिरी विधानसभा मतदार संघात विविध ठिकाणी विकास कामांची भूमिपूजन करण्यात आले. दौऱ्या दरम्यान शिरगांव ग्रामपंचायत हद्दीतील विविध विकासाच्या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री उदय सामंत आणि भावी खासदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत पार पडली. झालेल्या निवडणूकीच्या वेळेस तसेच गाव भेट कार्यक्रमाच्या वेळी जी जी आश्वास दिली होती ती आश्वासन पूर्ण केली हे सांगायला शिरगांवमध्ये आलो असल्याचे पालकमंत्री उदय सामंत म्हणाले.ते पुढे म्हणाले ग्रामीण भागातील महिलांना जशी एसटी मध्ये ५०% सवलत आहे तशीच शहरातील महिलांना एसटी मध्ये लवकरच ५०% सवलत मिळणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले.महिला बचत गटखेळतं भांडवल दुप्पट करण्यासाठी आज महिलांनी दिलेल्या ताकती मुळे आणि होय तुमच्यामुळेच मला यश आल्याचे उदय सामंत यांनी ठणकावून सांगितले. तुमचा आमदार म्हणून आणि रत्नागिरी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी तुमची विकासाची कामे करण्यासाठी कटीबद्ध असल्याचा शब्द यावेळेस पालकमंत्री उदयजी सामंत यांनी दिला. यावेळी भावी खासदार किरण उर्फ भैय्या सामंत,जिल्हा प्रमुख राहुल पंडित,सुदेश मयेकर,महिला तालुका प्रमुख कांचन नागवेकर,तालुका प्रमुख बाबू म्हाप,बिपीन बंदरकर,शिरगांव सरपंच फरीदा काझी,अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष अल्ताफ संगमेश्वरी,तुषार साळवी,जितेंद्र नेरकर, परेश सावंत,स्वप्नील शिवलकर, आदीसह अनेक ग्रामस्थ, पदाधिकारी उपस्थित होते.www.konkantoday.com