बचत गटाच्या महिलांच्या पाठपुराव्यामुळे पालवण परिसरातील बेकायदा दारूअड्डे पोलीस व महिलांनी धडक देत केले उध्वस्त
पालवण ग्रामपंचायत पदाधिकार्यांसह बचतगटाच्या महिलांनी बेकायदा सुरू असलेल्या दारू विक्रीप्रश्नी सावर्डे पोलीस स्थानकास काही दिवसांपूर्वी पत्र दिले होते. तरी देखील छुप्या पद्धतीने बेकायदा दारू विक्री करणार्यांवर पोलिसांसह महिलांनी संयुक्तपणे धडक देत ते उध्वस्त केले. विशेष म्हणजे धडक देतेवेळी महिलांसह पोलीस येताच दारू विक्रेत्यांनी तेथून पळ काढला. याप्रकरणी दोघा दारू विक्रेत्यांवर सावर्डे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्यांच्याकडून १० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सुनित अविनाश झिंगे (पालवण भाऊसाहेबत नगर) नारायण संभाजी पंडीत (तुरंबव-सहाणवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद साक्षी संतोष चव्हाण (३२ पालवण), अश्विनी अरूण पांचाळ (पालवण), यांनी दिली आहे.पालवण ग्रामपंचायतीच्या हद्दीत देशी विदेशी तसेच गावठी दारू व ऑनलाईन लॉटरी विनापरवाना सुरू अस्याने संबंधित व्यावसायिकांवर कारवाई करावी यासाठीचे पत्र पालवण ग्रामपंचायत तसेच महिला बचत गटाच्या महिलांनी सावर्डे पोलीस स्थानकाला दिले होते. या मागणीनुसार सावर्डे पोलिसांकडून दारू विक्रेत्यांवर कारवाई देखील केली होती. तरी देखील पालवण ग्रामपंचायतीच्या हद्दीत छुप्या पद्धतीने देशी विदेशी तसेच गावठी दाूची विक्री सुरू असल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. www.konkantoday.com