रत्नागिरीत राज्य नाट्य स्पर्धांना प्रारंभ

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ५९ व्या महाराष्ट्र हौशी मराठी नाट्य स्पर्धेला सोमवारपासून रत्नागिरीत सुरूवात झाली. ही प्राथमिक फेरी असणार आहे.
रत्नागिरीतील स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात १८ नोव्हें. रोजी सायं. ७ वा. या स्पर्धेचा शुभारंभ झाला. आज १९ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.३० वा. सुनील माळी लिखित आता उठवू सारे रान हे नाटक आकेश्‍वर सेवा मंडळ घागेळीवाडी या संस्थेच्यावतीने सादर केले जाईल. १९ नोव्हेंबरला सायं. ७ वा. संकल्प कलामंच, रत्नागिरीच्यावतीने नांगर या नाटकाचा प्रयोग सादर होईल. तर शेवटच्या दिवशी २० नोव्हेंबरला श्रीदेवी जुगाई कलामंच, ता. संगमेश्‍वर या संस्थेच्यावतीने अनमोल फेस हे नाटक सादर करण्यात येईल. या सर्व नाट्यप्रयोगांचा आस्वाद नाट्यप्रेमीनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button