राजापूर श्री २०२४ (तालुका मर्यादित ) किताब एझान मुल्ला याने, लिटिल चॅम्प्स राजापूर किताब रूद्र प्रवीणचंद्र जड्यार तर राजापूर श्री (जिल्हा मर्यादित) किताब वैभव मेस्त्री याने पटकावला

राजापूर, येथील शिवबा प्रतिष्ठान पुरस्कृत आणि रत्नागिरी जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटनेतर्फे आयोजित शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये राजापूर श्री २०२४ (तालुका मर्यादित ) किताब एझान मुल्ला याने, लिटिल चॅम्प्स राजापूर किताब रूद्र प्रवीणचंद्र जड्यार तर राजापूर श्री (जिल्हा मर्यादित) किताब वैभव मेस्त्री याने पटकावला.जवाहर चौकामध्ये झालेल्या या स्पर्धेमध्ये लहान मुलांनी केलेल्या बॉडीबिल्डिंग शोने साऱ्यांची मने जिंकली. राजापूर श्री २०२४ (तालुका मर्यादित) स्पर्धेत अभिनंदन सातोपे उपविजेता ठरला. उगवता तारा हा पुरस्कारही अभिनंदन सातोपे यानेच पटकावला. गाण्याच्या ठेक्यावर शरीराचे प्रदर्शन करणऱ्‍या हर्षद मांडवकर याला ‘बेस्ट पोझर’ किताबाने गौरवण्यात आले. स्पर्धेत अकरा मुलांनी सहभाग घेतला होता. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. मुकेश नाचरे, युवराज मोरे आणि त्यांच्या टीमने तायक्वाँदो खेळाची प्रात्यक्षिके दाखवून प्रेक्षकांची मने जिंकली. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सत्यवान लोळगे, संदेश आंबेकर, राजा खानविलकर, प्रसाद तांबट, संदेश गुरव, सुयोग परांजपे, अभिनंदन तावडे, राजू राणे यांसह शिवबा प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सदस्य यांनी मेहनत घेतली.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button