फास्ट फूड प्रशिक्षण मोफत घेण्याची सुवर्णसंधी
बँक ऑफ इंडिया पुरस्कृत स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था रत्नागिरी यांचेमार्फत दिनांक 06/03/2024 ते 15/03/2024 या १० दिवसांच्या कालावधीत स्वत: चा व्यवसाय सुरु करणाऱ्यांसाठी फास्ट फूड मोफत प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. प्रशिक्षणामध्ये कांदा ग्रेव्ही, टोमॅटो ग्रेव्ही, व्हाईट ग्रेव्ही, पालक पनीर, पनीर टिक्का मसाला, काजू मसाला, पनीर बुर्जी, मिक्स व्हेज, व्हेज कोल्हापुरी, सरंगा फ्राय, फिश करी, कोलंबी मसाला, चिकन कोल्हापुरी, चिकन हंडी, व्हेज पुलाव, व्हेज बिर्याणी, जीरा राईस, दाल तडका, पाव भाजी, भेळ, शेवबटाटापुरी, दही पुरी, पाणी पुरी, रगडा पुरी, तिखट चटणी, गोड चटणी, आंबट चटणी, हिरवी चटणी, कचोरी, कांदा बटाटा भजी, सामोसा, मोमोज, गोबी मंच्युरियन, व्हेज सूप, न्युडल्स, व्हेज फ्राइड राईस, व्हेज फ्रान्की, सँडविच याचा प्रशिक्षणात समावेश आहे. संवाद कौशल्य, व्यक्तिमत्व विकास, उद्योजकीय सक्षमता, वेळेचे महत्व या विषयी सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्रशिक्षण हे सलग असून सकाळी ०९:३० ते सायंकाळी ०५:३० या वेळेत होईल. प्रशिक्षणासाठी ३५ प्रशिक्षणार्थीची निवड करण्यात येणार आहे. सदर प्रशिक्षण हे मोफत असून चहा नाष्टा जेवण आणि निवासाची व्यवस्था विनामूल्य करण्यात आली आहे. सदर प्रशिक्षणासाठी वयोमर्यादा 18 वर्ष पूर्ण ते 45 वयोमर्यादेपर्यंत आहे. रत्नागिरी जिल्यातील दारिद्रय रेषेखालील व्यक्ती किंवा उमेद पुरस्कृत बचत गटातील महिला किंवा त्यांचा कुटुंबातील सदस्य, किंवा SECC लाभार्थी किंवा MGNREGA लाभार्थी यांना प्राधान्य असेल. अर्ज भरण्यासाठी येताना 1 फोटो, आधारकार्ड झेरॉक्स, रेशनकार्ड झेरॉक्स, पॅनकार्ड झेरॉक्स, मतदानकार्ड झेरॉक्स, शाळा सोडल्याचा दाखला झेरॉक्स, उमेद पुरस्कृत बचत गटातील महिला किंवा त्यांचा कुटुंबातील सदस्य असल्यास उमेद अभियान यांचेमार्फत देण्यात येणारे शिफारस पत्र, दारिद्रय रेषेखाली नाव असल्यास दारिद्रय रेषेखाली असल्याचा दाखला कार्यालयीन वेळेत घेवून येणे. प्रशिक्षणाचा पत्ता व अर्ज भरण्याचा पत्ता – स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था, अष्टविनायक सोसायटीच्या बाजूला, साई नगर, आर.टी.ओ. रोड, कुवारबाव. रत्नागिरी. ( शासकीय कामकाजाच्या दिवशी सकाळी. १० ते सायंकाळी ०५ या वेळेत 9834015522 / 02352 – 299191 क्रमांकावर संपर्क करणे )
www.konkantoday.com