
राजापूर तालुक्यात मनरेगातून बेरोजगारांना रोजगार
बेरोजगारांच्या हाताला काम देण्याच्या उद्देशाने शासनाने सुरू केलेल्या मनरेगा योजनेतून राजापूर तालुक्यामध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत. त्यातून २ हजार ७४९ कुटुंबातील ४ हजार ७६९ लोकांना ५१ हजार ७८६ दिवसांचा सात महिन्यांमध्ये रोजगार मिळाला आहे. पावसाळा आणि शेती हंगामामुळे सध्या कामे ठप्प आहेत. मात्र, दिवाळीनंतर पुन्हा नव्याने कामाला प्रारंभ होणार असल्याने त्यातून आणखी काही लोकांना रोजगार मिळणार आहे.
www.konkantoday.com




