मुंबई-गोवा महामार्गावर परशुराम घाटात रसायन भरलेला टँकर उलटला.


चिपळूण तालुक्यातील परशुराम घाटातील सवतसडा परिसरात महाड एमआयडीसीमधील लक्ष्मी ऑरगेनिक इंडस्ट्रीज लि. कंपनीतून इथाईल ऍसीटेट हे रसायन भरून महाड ते विशाखापट्टणम असा प्रवास करणारा टँकर उलटला. दि. १९ जानेवारी रोजी हा अपघात झाला.
विष्णुवर्धन कलाकोडा (वय २१, रा. ता. नगीगुड मंडल, जि. सर्यपेठ, राज्य तेलंगणा) यांनी या प्रकरणी येथील पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यानुसार चालक रविकुमार देवापंगू (वय २१, रा. एस.सी. कॉलनी, चन्ना आपल्या ताब्यातील टाटा टँकर घेऊन (क्र. एपी-३९ टीजी- ८७२४) महाड | एमआयडीसी (जि. रायगड) येथील लक्ष्मी ऑरगेनिक इंडस्ट्रीज लि. कंपनीतून इथाईल ऍसीटेट हे रसायन भरून महाड ते विशाखापट्टणम (आंध्रप्रदेश) या मार्गावर प्रवास करत होता. परशुराम घाट उतरल्यानंतर सवतसडा जवळील एका वळणावर रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहन अतिवेगात, बेदरकारपणे व निष्काळजीपणे चालविल्याने टँकर डाव्या बाजूला पलटी झाला. या अपघातात कोणालाही दुखापत झाली नसली तरी वाहनाचे मोठे नुकसान झाले असून टँकरमधील इथाईल ऍसीटेट रसायन सांडून आर्थिक नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button