*शीळच्या ६० टक्के पाणीसाठ्यावर आता भिस्त*
रत्नागिरी नगरवासियांना आतापासूनच काटकसरीने पाण्याचा वापर करावा लागणार आहे. कारण पाणीपुरवठा करणार्या नगर परिषदेच्या शीळ धरणात सध्या २.०५१ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा (६० टक्के) शिल्लक आहे. गेल्या हंगामात मान्सूनवर अल निनोचा राहिलेला प्रभाव व झालेल्या कमी पर्जन्यमानाने पाणीसाठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे आगामी वाढत्या उन्हाळ्याच्या काळात तापमानातील चढ-उतार व त्यामुळे पााण्याच्या होणार्या बाष्पीभवनाचा वेग यावर धरणातल पाणीसाठा यावर पुढील पाणीपुरवठ्याचे नियोजन ठरणार आहे.रत्नागिरी शहराला शीळ धरण, पानवल धरण आणि नाचणे येथील तलाव या तीन स्त्रोत्रांतून शहराला पाणीपुरवठा केला जातो. शहराला दररोज १९ ते २० एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. शहराला पाणीपुरवठा करणार्या शीळ धरणाची पाणी साठवण क्षमता ४.०३१ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. पण शीळ धरणात सध्या २.०५१ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. त्यामुळे हा पाणीसाठा पाहता आगामी काळासाठी शहरवासियांवर काटकसरीने पाणीवापर करण्याची वेळ येणार आहे. शहराला पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा करण्यासाठी नगर परिषदेच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेवर सुमारे ७३ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. ही पाणीयोजना सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे यापूर्वी होणारी या योजनेतून ३० ते ४० टक्के पाणी गळती थांबली आहे. शहराला सुमारे १० हजार २८८ हुन अधिक नळजोडण्या आहेत. त्या नागरिकांना प्रतिदिन १९ ते २० एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. पानवल धरणाची दुरूस्ती रखडलीय व नाचणे येथील पाणीपुरवठा केंद्राच्या मर्यादा आहेत. त्यामुळे शहराला एकट्या शीळ धरणातून सध्या पाणीपुरवठा केला जात आहे. www.konkantoday.com