
दुचाकीसमोर बैल आडवा आल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जखमी
रत्नागिरी शहराजवळील कर्ला भागात रस्त्यावरून जाणारा प्रीतम पारकर या दुचाकीस्वाराच्या समोर अचानक बैल आडवा आल्याने दुचाकी घसरल्याने झालेल्या अपघातात प्रितम हा किरकोळ जखमी झाला. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.रत्नागिरी शहर परिसरात सध्या मोकाट गुरे व भटके कुत्रे यांचे प्रमाण वाढले आहे .त्यामुळे अपघात होत आहेत नगर परिषदेकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने नाराजी आहे.
www.konkantoday.com